आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापांढुर्ली येथून घोटी मार्गाने बेलूकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने ट्रॅक्टरवरील एक ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.९) सायंकाळी साडेसातला घडली. या घटनेत ट्रकने ट्रॅक्टरला १०० मीटर पुढे लोटत नेले. झाड आणि ट्रॉलीमध्ये अडकून बेलू येथील उत्तम काशीनाथ तुपे (४२) या तरुणाचा मृत्यू झाला. ट्रॅक्टरचालक विलास केरू तुपे (३५) व रामभाऊ गिऱ्हे (५५) हे दोघे गंभीर जखमी झाले.
पांढुर्ली उपबाजारात ट्रॅक्टर-ट्रॉलीतून टोमॅटो विक्री करून घराकडे परतत असताना त्यांच्या ट्रॅक्टरच्या (एमएच १५ एचक्यू ९९८६) ट्रॉलीला पाठीमागून ट्रकने (एमएच १५ सीजे ५१००) धडक दिली. १०० मीटरहून अधिक अंतर ट्रॉली पुढे फरपटत जात झाडाला ट्रॉली अडकली. यात उत्तम तुपे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर बेलूचे सरपंच प्रकाश तुपे, चंद्रकांत वाजे, सूरज वाजे, कैलास वाजे, राहुल वाजे यांनी जेसीबीच्या सहाय्याने ट्रॉली दूर करत उत्तम तुपे यांचा मृतदेह बाहेर काढला. जखमींना एसएमबीटी रुग्णालयात दाखल केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.