आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:उच्च माध्यमिक विद्यालयांचा बारावी ; सिन्नर तालुक्याचा निकाल 93 %

सिन्नर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील २८ उच्च माध्यमिक विद्यालयांचा बारावी परीक्षेचा निकाल ९३.९ टक्के लागला. ४२८४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. ३९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३६४ विद्यार्थ्यांनी उच्च श्रेणी प्राप्त केली. १५४० विद्यार्थ्यांनी प्रथम ग्रेड मिळवला. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण तीन टक्के जास्त.तालुक्यात २४२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी २२१२ उत्तीर्ण झाले.

मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.४० टक्के इतके राहिले. १९५७ विद्यार्थिनी परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या होत्या, यापैकी १८५९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या हे प्रमाण ९४.९९ टक्के इतके राहिले. शेठ ब. ना. सारडा, नवजीवन डे स्कूल, महात्मा फुले, टी. एस. दिघोळे नायगाव, एस. एस. के, शताब्दी उच्च माध्यमिक आगासखिंड देवपूर, दातली, शहा, वडझिरे येथील उच्च माध्यमिक विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला.

बातम्या आणखी आहेत...