आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील दातली येथे बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या आठवड्यात आनंदा गबाजी भाबड या शेतकऱ्याच्या दोन गायी ठार झाल्याची घटना घडली आहे. दातली परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर सुरू आहे. त्याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांना या भागात तरसाचेही दर्शन झाल्याने शेतकरी वर्ग पुरता भयभयीय झाला आहे.
शेतात पाणी भरण्यासाठी रात्रीचा वीजपुरवठा असतो. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यावे लागते. परंतुु, बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. खंबाळे वनविभागाच्या बाजूने दातली, खंबाळे परिसरात बिबट्या शेतकऱ्यांना दिवसाही दर्शन देऊ लागला आहे. त्यातच बिबट्यासारखा दिसणारा तरस हा प्राणीही सतत नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. तीन दिवसांपूर्वी गायरान घोडब परिसरात रात्री शेतात बांधलेल्या आनंदा गबाजी भाबड यांच्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात आठ महिन्यांची कालवड ठार झाली. गाय लहान असल्याने भटक्या कुत्र्यांनी फाडले असावे असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
परंतु, दुसऱ्या दिवशीही भाबड यांच्या दुसऱ्या गायीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात गाभण गाय जखमी झाली होती उपचारादरम्यान त्याही गाईचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वन विभागाच्या कर्मचारी कांगणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी घटनास्थळी जात पाहणी करून पंचनामा केला. वारंवार मागणी करूनही या परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला नव्हता. मात्र, दोन गाईंचा मृत्यू झाल्यानंतर वन विभागाला जाग आली त्यानंतर येथे पिंजरा लावण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.