आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:मुंजवाड ते इंदिरानगर रस्ता खुला करण्यासाठी दोन तास आंदाेलन

सटाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंजवाड ते खमताणे दरम्यान, असलेल्या इंदिरानगर या आदिवासी वस्तीमधील ७० वर्षांपासून असलेला वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे तो पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी आरम नदीच्या पुलावर तब्बल दोन तास रास्तारोको केल्याने शालेय विद्यार्थ्यांसह वाहनचालकांची गैरसाेय झाली. यावेळी रस्ता तात्पुरता सुरु करून सोमवारी तहसीलदारांकडे संबंधीत शेतकरी व ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.मुंजवाड येथील इंदिरानगरमधील आदिवासी बांधवांना गावात येण्यासाठी अनेक दशकांपासून आरम नदीच्या काठालगत पाटाचा रस्ता होता.

पाट बंद झाल्यानंतर लागून शेती असलेल्या शेतकऱ्याने रस्ता आपल्या मालकीच्या शेतातून जात असल्याचे सांगून ताे बंद केल्यामुळे आदिवासी बांधवांची गैरसाेय झाली. येथील मुलांना शाळेत व रूग्णांना ग्रामीण रूग्णालयात जाण्यासाठीचा हा एकमेव जवळचा वहिवाटीचा रस्ता होता. गेल्या आठवड्यात या रस्त्यालगत शेती असलेल्या धर्मा जाधव यांनी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर चारी मारून रस्ता बंद केला होता.

यामुळे आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांसह रुग्णांची गरसाेय झाली. हा रस्ता तात्काळ सुरू करावा, या मागणीसाठी येथील रहीवाशांनी शनिवारी (दि.३) सकाळी सटाणा - डांगसौंदाणे रस्त्यावरील मुंजवाड गावाजवळील आरम नदीच्या पुलावर रास्ता रोको केला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शालेय बस अडकल्या. पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार, मंडळ अधिकारी मनोज भामरे, तलाठी राजेंद्र गरूड यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आदिवासी बांधवांशी व संबंधित शेतकरी धर्मा जाधव यांच्याशी चर्चा करून सोमवार (दि.५) रोजी तहसीलदारांकडे बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन देऊन तात्पुरता रस्ता सुरू केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

आंदोलनात म्हाळू रामदास पवार, बाळू पिंपळसे, दयाराम गांगुर्डे, नानाभाऊ गांगुर्डे, अंबादास सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, सचिन गांगुर्डे, सुभाष कुंवर, सतीष सोनवणे, गोकुळ अहिरे, सोमनाथ माळी, गणेश ठाकरे , सचिन पिंपळसे, रमेश निकम, सिंधूबाई पिंपळसे, वत्सलाबाई मधूकर माळी आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...