आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:अतिक्रमण सिद्ध झाल्याने कासारवाडी ग्रामपंचायतीचे दोन सदस्य अपात्र

सिन्नर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कासारवाडी येथील दोन सदस्य अपात्र ठरविण्यात आले आहेत. मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी मायादेवी पाटोळे यांनी याबाबतचा निर्णय दिला. कासारवाडी येथील ग्रामस्थ योगेश काकडे यांनी सदस्यांचे गावठाणात अतिक्रमण असल्याबाबत तक्रार केली होती. दीड वर्षापासून न्यायालयीन लढा सुरू होता. काकडे यांनी सदस्य विशाल राजेंद्र साळुंखे व अश्विनी दिनेश जगताप यांचे अतिक्रमण असल्याबाबत तक्रार केली.

अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्याने अप्पर जिल्हाधिकारी मायादेवी पाटोळे यांनी सदस्य विशाल साळुंखे, अश्विनी जगताप यांना पुढील कालावधीसाठी अपात्र ठरविले आहे. तशा आशयाचे निकाल पत्र देण्यात आले. अॅड. जगताप यांनी काकडे यांच्या वतीने काम पाहिले. तथापि या निकालाविरोधात अपील दाखल करण्यासाठी साळुंके व जगताप यांना १५ दिवसांची मुदत दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...