आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेऊन आत्महत्या:माळेगाव, भाटवाडीत दोघांची आत्महत्या

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भाटवाडी आणि माळेगांव येथे दोघांनी अज्ञात कारणांमुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भाटवाडी शिवारात एकाने कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कैलास जगन्नाथ डगळे (५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. डगळे यांनी आपल्या कांद्याच्या चाळीतील अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. नागरिकांनी त्यांना खाली उतरवून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसपाटील अनिल मधुकर डगळे (३२) यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात खबर दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक सारुक्ते करत आहेत.

अन्य एका घटनेत माळेगाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात काम करणाऱ्या एका तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. समीर संजय पिसे (२३, मूळ. रा. चंद्रपूर. हल्ली मु. माळेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. समीर हा माळेगावातील विलास खंडेराव आव्हाड यांच्या रूममध्ये भाडेतत्त्वावर रहात होता. त्याने रूममधील आड्याला मफलरच्या सहाय्याने गळफास घेतला. इतर कामगारांनी त्यास खाली घेत उपचारासाठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. शुभम प्रमोद मसराम (२३) याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास हवालदार मानकर करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...