आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा असूनदेखील लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणारी १६ गाव पाणीपुरवठ्याची पाइपलाइन जीर्ण झाली असल्याने सामाजिक बांधिलकी जपत जि. प. सदस्य डी. के. जगताप व बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी पदरमोड करून गावातील नागरिकांसाठी दाेन मोफत पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहे.
लासलगावातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात मुबलक असा पाणीसाठा उपलब्ध असताना केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे महिलांचे होणारे हाल लक्षात घेऊन डी. के. जगताप व सुवर्णा जगताप यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत टँकरमार्फत मोफत पाणीपुरवठा सुरूच राहील, असे सुवर्णा जगताप यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.