आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइगतपुरी तालुक्यातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या मुंढेगाव येथे थेट सरपंचपदी मंगला चंद्रकांत गतीर १०७२ मते मिळवत विजयी झाल्या तर प्रतिस्पर्धी रवींद्र लहानू गतीर यांना ७१३ मते, राजू सावळीराम गतीर यांना ४४८ मते, रोहन बन्सी गतीर यांना १९९ मते मिळाली. काही वर्षांपूर्वी सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांना थेट हेलिकॉप्टरने गावी आणणाऱ्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून आली. माजी सरपंच चंद्रकांत गतीर यांच्या त्या पत्नी आहेत. वर्षभरापूर्वी चंद्रकांत गतीर यांचे निधन झाले. मुंढेगाव ग्रामस्थांनी त्यांच्या परिवारावर मोठा विश्वास टाकला आहे.
तसेच ग्रामपंचायत सदस्यपदी सुनील बन्सी गतीर, सोमाबाई रमेश हंबीर,अलका सुनील तांगडे, नितीन यशवंत हंबीर, हितेश बुधा हंबीर, मंगाबाई भगवान हंबीर, कृष्णा अंबादास दुभाषे, ललिता सुभाष गतीर, जनार्दन दौलत गतीर, ललिता लक्ष्मण गतीर, पदमाबाई मच्छिंद्र दळवी हे निवडून आले. मुंढेगाव ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसनेने सत्ता संपादन केली. यावेळी विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.