आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना देण्यात आला उजाळा; 27 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांची शाळा

वडनेर भैरवएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक, पुणे, मुंबईसह राज्यभरात वेगवेगळ्या शासकीय, खासगी संस्थांमध्ये तर काही व्यावसायिक, व्यापारी बनलेल्या वडाळीभाेई विद्यालयातील सन १९९४-९५ च्या दहावीच्या बॅचचे जवळपास ५० हून अधिक माजी विद्यार्थी शाळा ओवारात एका कार्यक्रमात पुन्हा एकत्र जमले. माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात सुरुवातीला शाळेतील विविध खोल्यांमध्ये जाऊन आपण कुठल्या बेंचेसवर बसत होतो, कुठले कुठले खेळ खेळायचो. डबे खाण्याच्या ठिकाणी पुन्हा रिंगण करून विद्यार्थी बसले.

त्यानंतर गावातीलच साईदर्शन पॅलेस वडाळीभोई येथे एकत्र जमले होते. मैत्रिणी समोरासमोर आल्यावर काही क्षण ओळख न लागणाऱ्या मैत्रिणी काही वेळातच एकमेकींच्या गळ्यात पडत आनंद साजरा करीत होत्या. कार्यक्रमाचे नियोजन संतोष आहेर, अर्जुन आहेर आणि चित्रा शिर्के यांनी केले. चित्रा शिर्के ही महाराष्ट्रातील पहिली बसचालक असून संतोष आहेर यांनी ग्रुपच्या वतीने

तिचा सत्कार केला.
बालमैत्रिणी ज्योती आहेर व मंगला आहेर यांच्या पतीचे कोविडकाळात निधन झाल्याने त्यांच्या दुःखात सर्वजण सहभागी हाेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचवेळी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...