आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउजनी ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन व नम्रता पॅनलमध्ये सरळ लढती होत आहेत. निवृत्ती सापनर हे परिवर्तनकडून तर भाऊसाहेब सापनर नम्रता पॅनलकडून थेट सरपंचपदासाठी रिंगणात आहेत. सदस्यसंख्या नऊ असून आठ जागांसाठी लढती आहेत. वाॅर्ड क्रमांक तीनमधून चांदणी भीमराज माळी या अनुसूचित जमाती गटातून अगोदरच अविरोध निवडून आल्या आहेत. वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये संपूर्ण अंध असलेल्या सुषमा जगताप या परिवर्तन तर त्यांच्याविरोधात निर्मला माधव जगताप नम्रताकडून लढत आहे. सुषमा जगताप या अंध असल्याने लढतीकडे लक्ष लागून आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.