आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधान्य दुकाने, लाभार्थी संख्या व धान्य वाटपाची आकडेवारी घेतली आहे. गाेरगरीब जनतेला धान्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात धान्य दुकानदारांची भूमिका संशयास्पद दिसत आहे. महिनाभरात धान्य वितरण सुरळीत करा. लवकरच धान्य वाटपाचा गैरकारभार चव्हाट्यावर आणू, असा इशारा आमदार मुफ्ती माेहम्मद इस्माईल यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना दिला.
आमदार मुफ्ती यांनी गुरुवारी विश्रामगृहावर प्रभारी तहसीलदार कैलास पवार व धान्य वितरण अधिकारी दत्तात्रय शेजूळ यांच्याशी चर्चा केली. २०१४ पासून केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणे बंद झाले आहे. राज्यभर केशरी कार्डवर धान्य दिले जाते. मग मध्यच्या जनतेचे धान्य का बंद केले असा प्रश्न उपस्थित केला. शहरात किती धान्य दुकाने आहेत, लाभार्थ्यांची संख्या किती आहे, किती धान्याचा पुरवठा हाेताे याची आकडेवारी आमदार मुफ्तींंनी घेतली. ती पाहता गरिबांना वंचित ठेवून बाेगस लाभार्थींना धान्य वाटप हाेत असल्याचा आराेप केला. पुढील महिन्यात हाेणाऱ्या धान्य वाटपावर लक्ष ठेवून प्रत्यक्ष माहिती घेतली जाईल. यानंतर कुठले लाभार्थी वंचित राहिले व किती बाेगस लाभार्थींच्या नावावर धान्य वितरीत झाले याचा भांडाफाेड करण्याचा इशारा दिला. अधिकाऱ्यांनी प्रत्येक लाभार्थीला धान्य मिळेल याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले.
पाेलिसांच्या कारवाईंमुळे काळाबाजार उघड
पाेलिसांच्या कारवाईमुळे धान्याचा काळाबाजार उघड झाला आहे. अंगणवाडी, पाेषण आहार व रेशनचे धान्य पकडलेल्या ट्रकमध्ये सापडले आहे. याचा अर्थ गरीब जनता व शालेय मुलांच्या धान्यावरही डल्ला मारला जात आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. पाेलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखाेल चाैकशी करावी, असेही आमदार मुफ्ती यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.