आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैसर्गिक कृत्य:सटाण्यात चौदा वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य, संशयित ताब्यात

सटाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका मोबाइल शॉपीचालकाने एका १४ वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडित बालकाच्या पालकांनी सटाणा पोलिसांत मोबाइल दुकानदाराविरोधात तक्रार दिली असून, पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत संशयिताला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालक हा आपल्या मोठ्या भावाला जेवणाचा डबा देऊन घरी परतत होता.

त्यावेळी मोबाइल शॉपीचा मालक जीत राजपूत ऊर्फ जितेंद्र शिवाजी सूर्यवंशी (रा. दऱ्हाणे, ता. बागलाण) याने बालकाला दुकानात बोलावून अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. बालकाने बचाव करून आपले घर गाठले. घडलेला प्रकार घरी सांगितला असता पालकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तपास सहायक निरीक्षक वर्षा जाधव करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...