आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पाऊस:मनमाडला पुन्हा तासभर‎ अवकाळीचा तडाखा‎

मनमाड‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढगाळ वातावरण आणि अवकाळी‎ पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा‎ धास्तावला आहे. सोमवारी‎ मध्यरात्री सुमारे तासभर अवकाळी‎ पावसाने मनमाड व परिसरात पुन्हा‎ हजेरी लावली. शहर आणि‎ परिसरात वादळी वारे आणि या‎ अचानक झालेल्या पावसामुळे‎ दाणादाण उडाली. परिसरातील‎ शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर‎ नुकसान झाले.‎ सोमवारी मध्यरात्री मेघगर्जनेसह‎ अवकाळी पावसाने हजेरी लावली.‎

सोमवारी दिवसभर वातावरणात‎ कमालीचा उष्मा जाणवत होता.‎ रात्री साडेअकराच्या सुमारास‎ अचानक विजांच्या कडकडाटाने‎ मनमाड शहर दणाणून गेले. आणि‎ वादळी वाऱ्यासह तब्बल ५० मिनिटे‎ पावसाच्या हलक्या सरी पडल्या.‎ दरम्यान या अवकाळी पावसामुळे‎ आणि ढगाळ वातावरणामुळे‎ शेतकरी पुन्हा एकदा धास्तावला‎ अाहे तर बदलत्या वातावरणामुळे‎ आरोग्याच्या समस्या वाढल्या‎ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...