आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी:इगतपुरी तालुक्यात दाेन दिवसांपासून अवकाळी

घोटी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुक्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस दोन दिवसांपासून होत आहे. शेतीतील उभ्या व नुकतीच काढणी झालेले भात पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान, घोटी शहरात अवकाळी पावसाने अर्धा तास थैमान घातल्याने बाजारासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली होती.

अवकाळी पावसाने ऐन हंगामात शेतकऱ्यांची धावपळ करत आहे. पावसामुळे भात पिकाचे धान शेतातून घरी सुरक्षित ठिकाणी नेताना प्रचंड धावपळ झाली. तीन वाजेनंतर साधारण अर्धा तास पाऊस झाल्याने पिकाची खाचरे पूर्णपणे भरली. महसूल विभागाने त्वरित पंचनामे करावे, व मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आजच्या पावसामुळे तालुक्यातील शेकडो भात उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. पावसामुळे शेतात वाळत असलेले तनदेखील वाया गेले आहे. हाताशी आलेल्या भात, वरई व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बातम्या आणखी आहेत...