आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे महामार्गावरील सिन्नर बायपास ते शिंदे टोलनाक्या पर्यंतच्या पुलाजवळील सर्व्हिस मार्गावरची पथदीप व्यवस्था सुरू होण्याआधीच गुंडाळण्यात आली. दोन दिवसांपासून महामार्गावरील पथदीप काढण्यात येत आहेत. दरम्यान, बायपासपासून टोलनाक्यापर्यंत सर्व्हिस रोडवर पथदीप बसवण्याचा करारच सरकारने केला नाही. ही व्यवस्था फक्त शहरी भागासाठी नाशिकरोड जवळच्या दोन पुलांजवळ देण्यात आली आहे.
त्यामुळे एकाच प्रकल्पात सुविधा देताना शहरी व ग्रामीण असा भेदभाव झाल्याचे समोर आले आहे. चार वर्षांपूर्वीच बायपासवरील धोंडवीरनगर, मनेगाव, डुबेरे, घोटी महामार्ग, सरदवाडी, चिंचोली, कॉलेज, चिंचोली फाटा येथील पुलांजवळच्या काही सर्व्हिस रोडवर पथदीप व्यवस्थेसाठी वीज खांब उभे करण्यात आले होते. महामार्गावरील पुलांजवळ पथदीप नसल्याने लुटमारीसह गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वारंवार घडत आहेत. पथदीप बसवण्याची मागणी होत असतानाच दोन दिवसांपासून सर्व्हिस रोडवरील पथदीपांसाठी उभे केलेले खांब ठेकेदार कंपनीमार्फत काढण्यात आले आहेत.
या प्रश्नांकडे ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष बायपाससह टोलनाक्यापर्यंत महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.त्याची दुरुस्ती वेळेत होत नाही. पावसाळ्यात सर्वच पुलांखाली पाणी साचते. ते वाहून जाण्यासाठी व्यवस्था केली जात नाही. प्रत्येक पुलाजवळ अपघात टाळण्यासाठी आरसे बसविले आहेत. सद्यस्थितीत ते फुटले आहेत.
तसा करार झाला नाही
पुणे महामार्गावरील खेड ते गुरेवाडीपर्यंत सर्व्हिस रोडवर पथदीप सुविधेचा करार आहे. तसा करार गुरेवाडी ते नाशिक करिता नाही. वीज खांब चोरी जाण्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे कंपनी अधिकाऱ्यांनी खांब काढून घेण्यास सांगितले आहे. - हर्षल वाकचौरे, दुरुस्ती विभाग प्रमुख, चेतक कंपनी
महामार्गावर भेदभावाचे दोन मुद्दे
महामार्गावर नाशिकरोड जवळच्या दोन पुलांजवळ सर्व्हिस रोडवर पथदीप व्यवस्था केली आहे. बायपास ते नाशिक रोड या एकाच टप्प्यातील कामात शहर व ग्रामीण असा भेदभाव झाला आहे.खेड ते गुरेवाडी महामार्गावर ग्रामीण भागात सर्वच पुलांजवळील सर्व्हिस मार्गावर पथदीप व्यवस्था करण्यात आली आहे. या टप्प्यात शहर-ग्रामीण असा भेदभाव झाला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.