आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मनमाड रेल्वे कार्यशाळेत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. कामगारांच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
जुनी पेंन्शन बंद करावी, रेल्वे वर्कशॉपमध्ये नवीन वर्क ऑर्डर देण्यात याव्या, वर्कशॉपमधील पिण्याचे पाणी, मशिनसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, वर्कशॉपचे शेड लिकेज बंद करावे, ग्रुप डीच्या जागा भराव्या, वर्कऑर्डरसाठी वेळेवर कच्च्या मालाची पुर्तता करावी यासह कामगारांच्या सुरक्षेबाबत विविध प्रश्न मांडण्यात आले. सचिव नितीन पवार, महेंद्र चौथमल, प्रकाश बोडके यांनी या आक्रोश आंदोलन प्रसंगी कामगारांना संबोधित केले. व उपरोक्त मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
अध्यक्ष प्रकाश बोडके, सेक्रेटरी नितीन पवार, महेंद्र चोथमल, एकनाथ पाटील, खजिनदार मुक्तार शेख, गौतम वाघ, हेमंत सांगळे, वैभव कापडे, अरुण कलवर, शुभम माळवतकर, प्रशांत ठोके, नागेंद्र शुक्ला, सुनिल शिंदे, सोमनाथ सणस, बलराज तगारे, रमेश सिन्ना, स्वनिल महाजन, योगेश महाजन, असिफ खान, अमोल साळवे, वाल्मीक बाविस्कर, अमोल खाडे, सचिन साळुके, नंदू कदम, दिपक बोरसे, योगेश शेरेकर, इच्छाराम माळी, हेमंत माळी, राम आहेर, सागर हाडपे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.