आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमताने निर्णय:भाटगाव सोसायटी अध्यक्षपदी वसंतराव पवार अविरोध; उपाध्यक्षपदी यादव चव्हाण यांची निवड

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाटगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार यांची एकमताने निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी यादव चव्हाण यांची निवड झाली आहे.

भाटगावसह अंतरवेली, धानोरे व बाभूळगाव ही गावे सोसायटीचे कार्यक्षेत्र असून या सोसायटीची वाटचालदेखील प्रगतिपथावर आहे. संस्थेची स्वतःची इमारत असून वसतिगृहदेखील असल्याने हक्काचे उत्पन्न मिळते.

सोसायटीवर गेल्या दहा वर्षांपासून वसंतराव पवार व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. संस्थेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नुकतीच सभा झाली. यावेळी अध्यक्षपदी वसंतराव पवार तसेच उपाध्यक्षपदी यादव चव्हाण यांची निवड एकमताने अविरोध झाली.बैठकीला संस्थेचे संचालक माधवराव पवार, तुळशीराम जाधव, दत्तात्रय खडके, विठोबा कोकाटे, सागर गुंजाळ, इंदूबाई येवले, शोभा गुंजाळ, लहानबाई पवार, सविता चव्हाण, बंडू ठोंबरे, सुनील जगताप आदी संचालक मंडळ उपस्थित होते.

निवडणूकीत विजय मिळवल्यानंतर सर्व संचालकांनी मिळून एकमताने अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब करून एकोप्याचा आदर्श उभा केला आहे. यावेळी माधवराव पवार, शंकर होन, भास्कर वैद्य, मारुती गुंजाळ, अशोक गुंजाळ, सूर्यभान गुंजाळ, अण्णासाहेब गुंजाळ, अशोक आहेर, अण्णासाहेब आहेर, उत्तम घुले, आप्पासाहेब आहेर, ज्ञानेश्वर जाधव, भानुदास चव्हाण, जयराम पवार, अशोक चव्हाण, वसंत चव्हाण, बाळासाहेब ठोंबरे, भागवत गुंजाळ, चिंधू पवार, संजय मिटके, शांताराम खोडके, तावबा साबळे, संपत गुंजाळ, भरत गुंजाळ यांच्यासह आनेक कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. बी. औरादकर यांनी कामकाज पाहिले. सहायक अधिकारी म्हणून आर. जी. गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

बातम्या आणखी आहेत...