आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनमाड शहर काँग्रेस कमिटी कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अफजल शेख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून इंदूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको केले व निदर्शने करीत केंद्र सरकारविरूध्द घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारविरुद्ध घोषणा देत कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला. या प्रकाराने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी ताफ्यासह रास्ता रोकोच्या ठिकाणी धाव घेतली व कार्यकर्त्यांना प्रतिबंध केला. निवेदन घ्यावे यावरून कार्यकर्ते व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झडली.
अखेर पोलिस व शासनाला निवेदन देण्यात आल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अफजल शेख, माजी नगराध्यक्ष रहेमान शाह, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे, अशोक व्यवहारे, अॅड. शशिकांत व्यवहारे, बद्रू शेख, शंकरराव बोडखे, बी.टी. पद्मने, अनिल देवरे, इमरान शाह, फकिरराव शिवदे, सईद चिरागोद्दीन, विजय दरगुडे, अॅड. वाल्मीक जगताप आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.