आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:मालेगावात ग्राम कृषी संजीवनी समिती कार्यशाळा; माजी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन

मालेगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा)अंतर्गत नियुक्त ग्राम कृषि संजीवनी समितीची रविवारी (दि.७) दाभाडी रोडवरील बालाजी लॉन्स येथे सकाळी ९ वाजता कार्यशाळा होणार आहे. माजी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती विभागीय कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत मालेगाव तालुक्यात १२५ ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. एका समितीत १३ कार्यकारी सदस्य व ४ अकार्यकारी सदस्य अशा १७ सदस्यांचा समावेश आहे. ग्राम कृषी संजीवनी समितीत सरपंच, उपसरपंच व सदस्य, सहकारी संस्थेचा पदाधिकारी, प्रगतशील शेतकरी, शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषिताई, तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहाय्यक, कृषी पर्यवेक्षक क्षेत्रीय अधिकारी यांचा समावेश आहे.

या कार्यशाळेत प्रकल्पाचे मुंबई येथील तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतीमधील सर्व ग्राम कृषि संजीवनी समिती अध्यक्ष व समिती सदस्य तसेच मालेगाव तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट महिला बचत गट व स्वयं सहाय्यता गट यांचे प्रतिनिधी यांनीही सदर कार्यशाळेस उपस्थितीत राहावे , असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...