आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवरस्ता मोकळा करण्यात यावा, यासाठी शासनदरबारी अनेकवेळा निवेदने देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने दहेगाव, पाटोदा येथील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी उपविभागीय कार्यालयात शेळ्या-मेंढ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.दहेगाव, पाटोदा येथील गट नंबर ४७ व ४८ मधील शेतकऱ्यांकडून दहेगाव, पाटोदा व पिंपळगावलेप शिवरस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे.
यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे शेतकऱ्यांना कठीण बनले आहे. अतिक्रमण केल्याने शिवरस्ताच बंद झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनसुद्धा रस्ता खुला करून दिला जात नाही म्हणून येथील शेतकऱ्यांनी थेट आपल्या शेळ्या-मेंढ्या घेऊन उपविभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत रस्ता खुला करून दिला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. आंदोलनात बाबूराव काळे, गणेश दौंडे, एकनाथ काळे, नानाभाऊ काळे, अंबादास काळे, चांगदेव दौंडे, विठ्ठल दौंडे आदी सहभागी झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.