आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:राजापूरला सेवानिवृत्त सैनिक अनिल वाघ यांची ग्रामस्थांनी काढली मिरवणूक

येवला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशसेवा करून गावी परतलेल्या अनिल वाघ यांचे राजापूरच्या ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी आजी- माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, डॉ. सुधीर जाधव, सरपंच दत्ता सानप, सोसायटीचे चेअरमन परशराम दराडे व शिवराय ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जि. प. व माध्यमिक विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रमोद बोडके, ज्ञानेश्वर दराडे, दत्ता सानप, अण्णासाहेब मुंडे, ग्रामसेवक आर. एस. मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...