आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:देवळ्यात शासनाविराेधात‎ जाेरदार घाेषणाबाजी‎

देवळा‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार‎ पुकारत या राज्यव्यापी संपाला‎ पाठींबा दर्शवला. येथील‎ शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार‎ अर्पण करून आंदोलनाला सुरुवात‎ झाली. यावेळी प्रचंड घाेषणाबाजी‎ करण्यात अाली. तहसीलदार विजय‎ सूर्यवंशी व पोलिस निरीक्षक समीर‎ बारवरकर यांना विविध संघटनाच्या‎ वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात‎ आले. आंदोलनस्थळी पाठींबा‎ दर्शविण्यासाठी कृषी, शिक्षण,‎ जिल्हा परिषद, सार्वजनिक‎ बांधकाम, माध्यमिक शिक्षक,‎ आदिवासी विकास विभागातील‎ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी‎ खात्यांतील कर्मचाऱ्यांचा सहभाग‎ होता.‎

जुन्या पेन्शनसाठी आंदोलन‎ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माध्यमिक‎ शिक्षक संघ, टीडीएफ,‎ मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर‎ कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य‎ प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र‎ राज्य प्राथमिक शिक्षक संघ,‎ महाराष्ट्राचे अपंग कर्मचारी‎ संघटना, शिक्षक भारती, माध्यमिक‎ शिक्षक संघटना, लोकशाही शिक्षक‎ आघाडी, ग्रामसेवक युनियन,‎ लिपिकवर्गीय संघटना, परिचर‎ संघटना, शिक्षकेतर कर्मचारी‎ संघटना, जिल्हा परिषद महासंघ‎ अंतर्गत येणाऱ्या सर्व संघटना,‎ पदवीधर शिक्षक संघटना आदींनी‎ पाठींबा जाहीर केला.‎

बातम्या आणखी आहेत...