आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील एसएनजेबी संचलित श्रीमान सुरेशदादा जैन फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीयस्तरावरील “एसएनजेबी फार्माकाॅन - २०२२ : ग्लोबल रेग्युलेटरी चॅलेजेंस टू सिक अप्रुव्हल फाॅर एएनडीएज, मेडिकल डिव्हायसेस, हर्बल ॲण्ड न्युट्रास्युटिकल्स’ हे तीन दिवसीय व्हर्च्युअल चर्चासत्र उत्साहात पार पडले.उद्घाटन पद्मश्री डाॅ. रमण गंगाखेडकर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, महाविद्यालयाचे समन्वयक व प्रबंध समितीचे सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी, समन्वयक ॲड. प्रकाशचंद बोकडिया, प्राचार्य डॉ. सी. डी. उपासनी, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पी.पी. गाळणकर आदी उपस्थित होते.
या परिषदेचे समन्वयक डॉ. अतिश मुंदडा व डॉ. स्वाती जाधव यांनी ‘एसएनजेबी फार्माकाॅन-२०२२’च्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. या परिषदेसाठी डॉ. अमन, डॉ. बासरकर, प्रा. विधाते, प्रा. अमृते व प्रा. शहारे यांनी लिहिलेल्या शोधपुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. झूममार्फत देश-विदेशातील सुमारे १ हजार संशोधक व विद्यार्थ्यांनी चर्चासत्रात सहभाग नोंदविला. रोज दहा युवा संशोधकांनी संशोधन पत्रिका सादर केल्या. त्यांचे मूल्यांकन करण्यात आले. यापैकी डॉ. अडीलोये आडीवाले (साऊथ आफ्रिका), डॉ. शैलेंद्र गुरव (गोवा), डॉ. संदीप चव्हाण (मुंबई), डॉ. प्रमोद अग्रवाल (नेदरलॅण्ड), डॉ. सुमित सरकार (अमेरिका), डॉ. मुनीष धुमन (हैदराबाद) यांनी निवड केलेल्या संशोधकांच्या संशोधन पत्रिकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
डॉ. सरनजीत सिंग (चंदिगड), डॉ. प्रशांत निकम (ऑस्ट्रेलिया), डॉ. विवेक बोरसे (हैदराबाद), डॉ. अमित भोपळे (नागपूर), डॉ. अमित जोहरापूरकर (अहमदाबाद), डॉ. प्रसाद ठाकूरदेसाई (पुणे) या तज्ज्ञांनी या परिषदेत मार्गदर्शन केले. या सत्रात डॉ. चट्टपल्लीवार डॉ. बासरकर, डॉ. पाटील, डॉ. अमन उपगनलावर, डॉ. महाजन, डॉ. नेमाडे यांनी सहसमन्वयकाची भूमिका पार पाडली. तीन दिवसीय व्हर्च्युअल चर्चासत्र समारोपप्रसंगी तन्मय मंदलीय (इंदोर) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. परिषदेचे सूत्रसंचालन प्रा. वैभव बुचके यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.