आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावृक्ष संवर्धनाची जनजागृती करण्याबरोबरच त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्यासाठी एस जी प्राथमिक शाळेत येणाऱ्या पाहुण्यांचा सत्कार रोप लावलेली कुंडी भेट देऊन करण्यात येणार आहे. हार, गुच्छ, शाल, श्रीफळ यांचा वापर टाळण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी १०१ कुंडीत वृक्षारोपांची लागवड केली.
माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थी दशेपासून पर्यावरण संवर्धनाचे संस्कार व्हावेत यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कुंडीत रोप लावण्यासाठी इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गांची चिठ्ठी पद्धतीने निवड करण्यात आली. दोन्ही वर्गांना प्रत्येकी ५० कुंड्या वाटून देण्यात आल्या. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन कुंड्या भरणे, रोप लावणे याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. त्यासाठी विटांचे बारीक तुकडे, नारळाच्या शेंड्या, लाल माती, काळी माती, वाळू, शेणखत, लाकडी भुसा, कुंड्यानां छिद्र पाडण्यासाठी साहित्य, कुंड्यात लावण्यासाठी रोपे, पाणी यांची पूर्वतयारी करण्यात आली होती. बापू चतुर यांनी प्रात्यक्षिक सादर केले. प्राथमिक विभागाचे सोमनाथ थेटे, भास्कर गुरुळे, पांडुरंग लोहकरे, बापू चतूर, सागर भालेराव, जिजाबाई ताडगे, जयश्री सोनजे, वृषाली जाधव, सतीश बनसोडे, अमोल पवार, गणेश सुके, मंदा नागरे, कविता शिंदे, सुधाकर कोकाटे, पद्मा गडाख, योगेश चव्हाणके, नीलेश मुळे, सुवर्णा वारुंगसे, रामेश्वर बलक आदी उपस्थित होते.
वृक्ष आपले मित्र
वृक्षसंवर्धन, झाडे लावा, झाडे जगवा, झाडावरती प्रेम करा, झाडे तोडू नये. लावलेल्या झाडांची योग्य निगा राखावी. झाडे आपल्याला सावली, फळे देतात. ते आपले मित्र असल्याचे मार्गदर्शन मुख्याध्यापक उदय कुदळे यांनी केले. प्रत्यक्ष कृतीतून दिलेले शिक्षण हे शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या जीवनात उपयोगी पडते. यांचा अनुभव देण्यासाठी सचिव राजेश गडाख यांचा नेहमी अट्टहास असल्याचे त्यांनी सांगितले. भास्कर गुरुळे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश सुके यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.