आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात चांदवड तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश असून २८ नोव्हेंबरपासून नामनिर्देशनपत्रे सादर करता येणार असून दि. १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, निवडणूक शाखेचे दिलीप मोरे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींपैकी ३५ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे.
यात चांदवड तालुक्यातील आडगाव, बोराळे, भाटगाव, भुत्याणे, चिंचोले, दहेगाव म., चिखलांबे, दरेगाव, देवरगाव, दुधखेड, दुगाव, डोणगाव, गणूर, कोकणखेडे, कुंदलगाव, काजीसांगवी, खेलदरी, खडकओझर-गुऱ्हाळे, मालसाणे, मेसनखेडे बुद्रुक, निंबाळे, निमोण, नारायणगाव, पाटे-कोलटेक, पुरी, रेडगाव खुर्द, साळसाणे, सोनीसांगवी, शेलू, शिंगवे, तळेगावरोही, तळवाडे, वाद, वडाळीभोई, विटावे या ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
१८ नोव्हेंबर : तहसीलदारांकडून नोटीस प्रसिद्ध.
१८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर : अर्ज दाखल करणे.
५ डिसेंबर : अर्जांची छाननी.
७ डिसेंबर : अर्ज माघारी व निवडणूक चिन्ह वाटप.
१८ डिसेंबर : मतदान.
२० डिसेंबर : मतमोजणी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.