आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेवला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. १३) शहरातील जनता विद्यालयात मतदान होत आहे. समृद्धी, प्रगती आणि जगदंबा पॅनलमध्ये लढत होत आहे. सत्ताधारी संचालकच आमनेसामने दोन पॅनलमधून उभे आहेत.
बँकेचे १४,६७५ सभासद मतदार असून बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्वसाधारण १० जागांसाठी २७ उमेदवार, महिला राखीव दोन जागांसाठी ५ उमेदवार, इतर मागास वर्ग गटाच्या एका जागेसाठी ४ उमेदवार, भटक्या विमुक्त जाती जमाती गटाच्या एका जागेसाठी ५ उमेदवार, अनुसूचित जातीजमाती गटाच्या एका जागेसाठी ३ असे एकूण १५ जागांसाठी एकूण ४४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
‘समृद्धी’ व ‘प्रगती’ या दोन पॅनलने १५ जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरवले असून ‘जगदंबा’ पॅनलतर्फे सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विंचूररोडवरील जनता विद्यालयाच्या इमारतीत रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होत आहे. जनता विद्यालयाच्या इमारतीत एकूण ३० मतदान केंद्र असणार असून प्रत्येक मतदान केंद्रात ५०० मतदार याप्रमाणे मतदार केंद्रांची उभारणी असणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक प्रताप पाडवी यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.