आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे; वाडीवऱ्हेत लक्झरी बस व कार अपघातात पती-पत्नी गंभीर

घोटीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे फाट्यावर शनिवारी (दि. २५) मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास लक्झरी बस आणि कारचा अपघात झाला. अपघातात कारमधील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचे वृत्त समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धामच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसूचकतेने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील गंभीर जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

मुंबईहून नाशिककडे जाणारी लक्झरी बसने (एमएच ०९ सीव्ही ३६४५) नाशिककडून वाडीवऱ्हे गावाकडे वळण घेत असलेल्या कारला (एमएच ०२ पीए ५२७९) जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारमधील यशवंत एकनाथ लहांगे (४५) योगिता यशवंत लहांगे (३९, दोघे रा. लहांगेवाडी, ता. इगतपुरी) हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले.