आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका:प्रभागांची रचना व 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या; पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीची प्रभागरचना जाहीर

पिंपळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभाग १ : आग्रारोड पश्चिम बाजूने कादवा नदी पुलाचा कोपरा ते नदीच्या उत्तर बाजूपासून ते उंबरखेड शिव ते पालखेड कालव्याच्या दक्षिण बाजूने चिंचखेड चौफुलीपर्यंत चिंचखेड रस्त्याची दक्षिण ते महामार्गाच्या पश्चिम बाजूने कादवा पुलाचा कोपऱ्यापर्यंतचा संपूर्ण क्षेत्र
लोकसंख्या : ७९४४
प्रभाग २ : चिंचखेड चौफुलीपासून चिंचखेडरोडच्या उत्तर बाजूच्या नाल्यापर्यंत पालखेड कालव्याच्या उत्तर बाजू उंबरखेडच्या शिवपर्यंतच्या पश्चिम शिवेने वणीरोडच्या दक्षिण बाजूने वणी चौफुलीपर्यंत
लोकसंख्या : ७१३७
प्रभाग ३ : चिंचखेड शिवेपासून वणीरोडच्या उत्तर बाजूने वणी चौफुली व तेथून राष्ट्रीय महामार्गाच्या उत्तर बाजूने पिंपळगाव ते पाचोरा वणी शिवपर्यंत
लोकसंख्या : ५२५९
प्रभाग ४ : वणी चौफुलीपासून महामार्गाच्या दक्षिण बाजूने पाचोरा वणी-आहेरगाव शिवपर्यंत वणी चौफुली जुन्या आग्रारोडच्या पूर्वेकडील बाजूने ते मनाडी नाल्यापर्यंत ते मनाडी नाल्याच्या उत्तर बाजूने नदीपर्यंत व नदीच्या पूर्वेकडील निफाडरोडच्या उत्तर बाजूने आहेरगाव-लोणवडी शिवपर्यंत लोकसंख्या : ७१७४
प्रभाग ५ : निफाड चौफुली ते जुन्या रोडच्या पूर्वेकडील बाजूने नाल्यापर्यंत व मनाडी नाल्याच्या दक्षिण बाजूने नदीपर्यंत व नदीच्या पूर्वेकडे निफाड रोडची दक्षिण बाजूने लोणवडी-बेहेड शिव ते कादवा नदीच्या पुलापर्यंत व तेथून महामार्गाची पूर्व बाजूने जुना आग्रारोडची पूर्व बाजूने मनाडी नाल्यापर्यंत
लोकसंख्या : ७३३१
प्रभाग ६ : एस.टी. डेपोसमोरील नवीन व जुन्या आग्रारोडच्या कोपऱ्यापासून नवीन आग्रारोडच्या पूर्वेकडील हद्दीने वणी चौफुलीपर्यंत व वणी चौफुलीपासून जुन्या आग्रारोडच्या पश्चिमेकडील बाजूने एस. टी. डेपोसमोरील नवीन- जुन्या आग्रारोडच्या कोपऱ्यापर्यंत
लोकसंख्या : ६७१४

बातम्या आणखी आहेत...