आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:प्रभागानुसार आरक्षण जाहीर; ग्रामपंचायत आरक्षणावर सहा नागरिकांच्या हरकती

पिंपळगाव बसवंत17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी (दि. ६) प्रभागानुसार आरक्षण जाहीर झाले. यावर चार प्रभागांमधील सहा नागरिकांनी तहसील कार्यालयात हरकतींची नोंद केली असून पुढील सुनावणी १६ जून रोजी होणार आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार असल्याने ६ जून रोजी सहा प्रभागांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकानुसार आरक्षण जाहीर केले.

यावर ४ प्रभागांमधील नीलेश पाटील, बापूसाहेब पाटील, अल्पेश पारख, दीपक मोरे, अंकुश वारडे, शिवाजी गांगुर्डे या सहा नागरिकांनी निफाड तहसीलदार कार्यालयात सोमवारी (दि. १३) लेखी हरकती नोंदविल्या आहेत. या आरक्षण हरकतीवर १६ जून रोजी सुनावणी होणार असून अंतिम प्रभाग निहाय आरक्षणावर २० जून रोजी निर्णय होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...