आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:दहिकुटे बंदिस्त कालवा कामाविराेधात इशारा

मालेगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बाेरी अंबेदरीनंतर दहिकुटे लघुपाटबंधारे प्रकल्पाचे कालवे पाइपबंद करण्याच्या कामास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विराेध केला आहे. नियाेजित प्रकल्पाचे काम तातडीने थांबवावे, अन्यथा, ५ डिसेंबरपासून चक्री उपाेषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी दुपारी आंदाेलक शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी माया पाटाेळे यांची भेट घेत निवेदन सादर केले.

सुमारे २५ काेटीच्या निधीतून बाेरी अंबेदरी व दहिकुटे प्रकल्पांचे कालवे बंदिस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दहीकुटे कालवा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेला आहे. सदर कालवा हा १९७० पासून कायम आहे. कालव्याच्या पाण्यावर माणके, चिखलओहाेळ, महाजन वस्ती, टाेकडे, जळकू, दहिकुटे येथील शेतकऱ्यांचे ५३० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

कालव्यावरच परिसरातील शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. कालवे बंदिस्त केले तर शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेणार आहे. ऐन उन्हाळ्यात या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागताे. टंचाईग्रस्त चार गावांसाठी कालवे बंदिस्त झाल्यास हा परिसर पूर्णत: ओसाड हाेईल. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता कालवे बंदिस्त याेजनेचे काम तातडीने थांबविण्यात यावे.

विराेध झुगारून काम सुरू
शेतकऱ्यांचा विराेध झुगारून बंदिस्त जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले जात आहे. कालव्याच्या परिसरात सिमेंट पाइप आणले गेले आहे. आंदाेलनकर्त्या शेतकऱ्यांशी झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्याने काम सुरू करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू आहेत. शेतकऱ्यांचा विराेध व कामाच्या हालचालींमुळे आंदाेलन चिघळण्याची चिन्हे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...