आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाडला पालिका प्रशासनाचे नियाेजन:वीजपुरवठा सुरळीत हाेताच 12 ते 13 दिवसांआड पाणी

मनमाड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचानक आलेल्या पावसामुळे व वागदर्डी जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरातील बराच भाग प्रभावीत झाला आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन पुन्हा १४ ते १५ दिवसांआड करण्यात येत आहे. मात्र, वीजपुरवठा सुरळीत हाेताच शहराला १२ ते १३ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियाेजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराला १० ते १२ दिवसांत पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली हाेती. त्यानुसार पालिकेने नियाेजनही सुरू केले हाेते. मात्र, अचानक आलेला पाऊस व जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने हे नियाेजन काेलमडले आहे. त्यामुळे शहराला परत १४ ते १५ दिवसांआड पाणी दिले जात आहे. मात्र, वीजपुरवठा सुरळीत हाेता. १२ ते १३ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...