आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा‎:मोरडा, दांडीचीबारी‎ येथे पाणीटंचाई,‎ प्रस्ताव मंजूर‎

बोरगाव‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाचे माहेरघर असलेल्या‎ सुरगाणा तालुक्यात यावर्षीही पाणी‎ टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली‎ असून तालुक्यातील दोन गावांचा‎ प्रस्ताव तहसील कार्यालयात‎ आलेला आहे. त्या प्रस्तावांना त्वरित‎ मंजुरी देण्यात आली असून‎ लवकरच पाण्याचे टँकर सुरू होणार‎ असल्याची माहिती तहसीलदार‎ सचिन मुळीक यांनी दिली.‎ सुरगाणा तालुक्यात मागील वर्षी‎ उन्हाळ्यामध्ये पंधरा ते वीस‎ गावांमध्ये १० टँकरने पाणीपुरवठा‎ करण्यात येत होता.

ही परिस्थिती‎ गेल्या अनेक वर्षांपासून कायम‎ आहे. यावर्षीही पाणीटंचाईच्या झळा‎ फेब्रुवारीअखेरपासून बसण्यास‎ सुरूवात झाली आहे. सुरगाणा‎ तालुक्यातील कुकुडमुंडा‎ ग्रामपंचायत अंतर्गत दांडीचीबारी,‎ खोबळा ग्रामपंचायत अंतर्गत मोरडा‎ या पाड्यावरील आदिवासी‎ बांधवांनी पाणी टँकरची मागणी‎ तहसील कार्यालयात केलेली आहे.‎ या मागणीला त्वरित मान्यता देण्यात‎ आली असून पुढील कार्यवाही‎ पंचायत समितीमार्फत राबवण्यात‎ येणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...