आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी:मालेगाव तालुक्यात सहा गावांना पाणीटंचाईच्या झळा; प्रस्ताव प्राप्त होताच टँकरने पुरवठा करण्याचे नियोजन

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाची तीव्रता वाढताच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. तालुक्यातील मेहुणे, रामपुरा, कजवाडे, मांजरे, एरंडगाव व सावकारवाडी या गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. संबंधित गावांच्या ग्रामपंचायत प्रशासनाने टँकर मागणी प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात पंचायत समितीशी संपर्क साधला आहे. प्रस्ताव प्राप्त होताच तातडीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

शहर व तालुक्यात तापमानाचा पारा ४३.६ अंश सेल्सिअस या उच्चांकावर पोहोचला आहे. उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होवून जलपातळी खालवत चालली आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मेहुणे, रामपुरा, कजवाडे, मांजरे, एरंडगाव व सावकारवाडी गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी या गावांकडून लवकरच टँकर मागणी प्रस्ताव सादर होणार आहेत.

साधारण ४ ते ५ दिवसांत या गावांना टँकरने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. सदर गावांच्या परिसरातील पाण्याचे स्त्रोत विचारात घेऊन विहिरी अधिग्रहित केल्या जाणार आहेत. गावांच्या लोकसंख्येनुसार १२ ते २४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरने पाणीपुरवठा होणार आहे. एप्रिल व मे महिन्यात टँकर मागणी प्रस्ताव वाढणार असल्याने पंचायत समितीने टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव प्राप्त होताच त्यावर त्वरित निर्णय घेतला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...