आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मुख्य जलशुद्धीकरण केंद्राला जोडणाऱ्या जलवाहिनीला काही ठिकाणी गळती लागली असून उंबरदे येथे जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने या कामांच्या दुरुस्ती काळात शनिवारी शहरातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी खंडित करण्यात येणार आहे,अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. शहराला तळवाडे पाणी साठवण तलाव तसेच गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. चणकापूर धरणातील पाणी तळवाडे येथे साठवले जाते. येथून गुरुत्व वाहिनीने ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येते.
तसेच गिरणा धरणातूनही पाणी पंपिंग करून सायने येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. या दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांना काही ठिकाणी गळती लागली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी येथील पंपिंग एक दिवसासाठी बंद करावे लागणार आहे. यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा होण्यात एक दिवसाचा अडथळा होईल. या काळात शहरासाठी नियोजनानुसार पाणी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शनिवारी शहरात पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. दिवसभरात ही सर्व कामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर रविवारपासून नियोजित वेळापत्रकानुसार शहरात पाणीपुरवठा केला जाईल. अर्थात ज्या भागात शनिवारी पाणीपुरवठा होणार होता, त्या भागात रविवारी पाणी पुरवठा होईल. अशा पद्धतीने शनिवार नंतर नियोजित वेळापत्रकात एक दिवसाचा विलंब पडणार आहे. या काळात नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.