आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी सुखावला:‘आर्द्रा’च्या पहिल्याच दिवशी जलधारा ; शेतीकामांना येणार वेग

सिन्नर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिवडे येथे शेळ्या चारत असताना वीज पडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २२) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र आनंदा पवार असे मयत तरुणाचे नाव आहे.

दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असताना मयत रवींद्र हा त्याच्या पत्नीसोबत शेळ्या चारत होता. जोरदार पाऊस सुरू झाल्याने जवळच असलेल्या झाडाखाली त्यांनी आश्रय घेतला. मात्र, त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने रवींद्रचा जागीच मृत्यू झाला. शेजारीच असणाऱ्या त्याच्या पत्नीलाही विजेचा सौम्य झटका बसला. ग्रामस्थांनी तत्काळ दोघांनाही गावातील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी रवींद्रला तपासून मृत घोषित केले. तर त्याच्या पत्नीस पुढील उपचारासाठी खासगी दवाखान्यात पाठवले.

बातम्या आणखी आहेत...