आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दर्ग्याचे बांधकाम ग्रामस्थांच्या मागणीनुसार करू ; चांदशावलीबाबा दर्ग्याला भेट

मनमाड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी पानेवाडी येथील तिसऱ्या रेल्वे लाइनला अडथळा ठरणाऱ्या चांदशावलीबाबा दर्ग्याच्या ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी आमची कुठलीही हरकत नाही, मात्र जेथे जागा देऊ तेथे सदर दर्ग्याचे काम सर्व सुविधांनिशी करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. ती मंजूर केल्यामुळे या वादावर पडदा पडला आहे. यावेळी प्रांताधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, तलाठी जी. ए. शिरसाठ, रेल्वेचे पी. बी. सक्सेना, मंडल अधिकारी आर. एम. परदेशी आदी उपस्थित होते. पानेवाडी ग्रामस्थांतर्फे बाजार समितीचे माजी सभापती अंकुश कातकाडे, सरपंच उत्तम पवार, सोसायटी अध्यक्ष नवनाथ सांगळे, मधुकर आव्हाड आदींनी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला. रेल्वेच्या तिसऱ्या लाइनच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी अडचणींचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

मांडवड ते हिसवळ खुर्द रस्त्याबाबत ग्रामपंचायतींच्या वतीने निवेदन मांडवड ते हिसवळ खुर्द ब्रिटिशकालीन रस्ता सुरू होता. परंतु रेल्वेची तिसरी लाइन सुरू झाल्याने सदरचा रस्ता बंद झाला आहे. याबाबत हिसवळ खुर्द ग्रामपंचायत व मांडवड ग्रामपंचायत या दोन्हींच्या वतीने जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांना निवेदन देण्यात आले होते. दोन्ही गावांच्या तक्रारीची दखल घेत व जागेवर येऊन उपस्थितांची त्यांनी चर्चा केली व यातून शासनस्तरावर योग्य तो मार्ग काढण्याबाबत रेल्वेचे अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याबाबत सूचना केल्या. रेल्वे लाइनलगत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी असल्याने त्याही ठिकाणी नव्याने सुरू असलेल्या तिसऱ्या लाइनमुळे रस्त्याबाबत अनेक अडचणी असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी सांगितल्या. यावेळी हिसवळचे सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, मांडवडचे सरपंच विठ्ठल आहेर, अशोक निकम, दत्तू निकम आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...