आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदिस्त कालवे:बाेरी अंबेदरी बंदिस्त कालव्याचे काम थांबविण्यासाठी प्रयत्न करू

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाेरी अंबेदरी बंदिस्त कालवा जलवाहिनी विराेधात आदाेलन पुकारणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी (दि.१०) मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. काहीही झाले तरी खुल्या पाटचारीने पाणी मिळावे, अशी मागणी केली. पवारांनी शेतकऱ्यांना दिलासा देत बंदिस्त कालव्याचे काम थांबविण्याचे प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे.

बंदिस्त कालव्याला स्थानिक शेतकऱ्यांचा विराेध आहे. दुसरीकडे बंदिस्त कालव्याच्या समर्थनार्थ काही शेतकरी एकवटले आहे. राजकीय दबावामुळे काम सुरु हाेण्याच्या धास्तीपाेटी विराेधात आंदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी थेट शरद पवारांकडे गाऱ्हाणे मांडले. हा प्रकल्प तापी खाेरे अंतर्गत टिंगरी गावाजवळील बाेरी अंबेदरी नदीवर बांधण्यात आला आहे. १९९२ मध्ये माती धरणाचे काम पूर्ण झाले आहेत. धरणाच्या लाभ क्षेत्रात झाेडगे, अस्ताणे, दहिदी, टिंगरी, वनपट, जळकू, लखाणे, राजमाने या गावांचा समावेश आहे. बंदिस्त कालवा झाला तर या गावांचे शेतकरी उद‌्ध्वस्त हाेतील. बंदिस्त कालव्याची सदर गावांनी मागणी केलेली नसताना हा प्रकल्प रेटण्याचे काम हाेत असल्याची कैफियत शेतकऱ्यांनी मांडली. भविष्याच्या चिंतेमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या दाेघा शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ७ नाेव्हेंबरपासून धरणाजवळ आंदाेलन सुरु असल्याची माहिती पवारांना देण्यात आली.

शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत निवेदन सादर केले. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत पवारांनी बंदिस्त कालव्याचे काम थांबविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिली आहे. यावेळी शेतकरी भूषण कचवे, समाधान कचवे, मनाेज कचवे, शरद शिंदे, गणेश ठाकरे, प्रकाश बिचकूल, विकी कचवे उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...