आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बौद्ध‎‎‎‎‎‎‎‎‎‎ धम्म पदयात्रा:बौद्ध धम्म पदयात्रेचे निफाड येथे स्वागत‎

निफाड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान गौतम बुद्धांचा पवित्र अस्थि‎ कलश घेऊन परभणी ते मुंबई पायी‎ जाणाऱ्या भिक्खू संघाच्या बौद्ध धम्म‎ पदयात्रेचे येथे स्वागत करण्यात‎ आले. पदयात्रा मार्गावर रांगाेळ्या‎ काढण्यात आल्या हाेत्या.‎ चला बुद्धाच्या मार्गाने चला,‎ अहिंसेच्या मार्गाने, हा विश्वशांतीचा‎ संदेश देण्यासाठी भगवान गौतम‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बुद्धांचा पवित्र अस्थिकलश घेऊन‎ आंतरराष्ट्रीय ११० भिक्खूंची बौद्ध‎‎‎‎‎‎‎‎‎‎ धम्म पदयात्रा परभणी ते मुबंई अशी‎ निघाली आहे.

बुद्ध धम्म यात्रेचे‎ मुख्य आयोजक सिने अभिनेते गगन‎ मलिक व डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे‎ यांच्यासह थायलंड येथील ११०‎ भिक्खूंचा समावेश आहे‎ स्वागतानंतर ही पदयात्रा निफाड‎ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर स्मारक येथे आली.‎ यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात‎ धम्मदेसना वंदना दिली. कार्यक्रमास‎ नागरिक उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...