आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकी‎:थकीत मालमत्ता करवसुलीसाठी‎ येवल्यात पालिकेचे ढोल बजाव‎

येवला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

थकीत मालमत्ता करवसुलीसाठी‎ पालिकेने विशेष मोहीम हाती‎ घेतली आहे. ढोल व बँड वाजवत‎ ‘भाेली सुरत दिल के खोटे, थकीत‎ कर भरा नाही तर होणार‎ पालिकेला तोटे...’ अशी साद‎ घालत वसुलीसाठी पालिकेचे‎ अधिकारी व कर्मचारी शहरात‎ फिरत असल्याने चर्चेला उधाण‎ आले आहे.‎ सुमारे पंधरा कोटींच्या‎ आसपास कर्जाचे ओझे‎ पालिकेवर आहे. मागील दोन वर्षे ‎े‎ कोरोनामुळे वसुलीवर परिणाम‎ झाला होता,त्याची झळ अजूनही‎ सहन करावी लागत आहे. मार्च‎ अखेरीस पालिकेची ९०‎ टक्‍क्‍यांच्या आसपास वसुली होते,‎ परंतु यावेळी कराची रक्कम‎ मोठ्या प्रमाणावर येणे बाकी आहे.‎ पालिकेच्या वतीने नागरिकांना‎ मालमत्ताकर , पाणीपट्टी, गाळा‎ भाडे, जागा भाडे आदी कराच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पावत्या दिवाळीच्या पूर्वी व नंतर‎ वाटप केल्या आहेत.

ही वसुली‎ वर्षाअखेरीपूर्वी भरणे अपेक्षित‎ असताना थकीत रक्कम वाढली‎ आहे. महिन्यापासून पालिकेचा‎ वसुली विभाग शहरातील सर्व‎ करदात्याकडे जाऊन वेगवेगळ्या‎ करांच्या रकमा जमा करत‎ आहे,असे असूनही अनेक जण‎ टाळाटाळ करत असल्याने अखेर‎ पालिकेने धडक मोहीम हाती‎ घेतली आहे. पालिकेचे‎ नागरिकांकडे सुमारे ८ कोटी रुपये‎ येणे असून आत्तापर्यंत सुमारे ३ ते‎ साडेतीन कोटी रुपये जमा झालेले‎ आहेत. तर चार ते साडेचार कोटी‎ रुपये थकीत आहेत. काही जणांनी‎ तर मागील दोन ते चार वर्षांत कर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ भरलेला नाही.त्यामुळे त्यांना जागे‎ करण्यासाठी काही‎ थकबाकीदारांच्या घरासमोर तसेच‎ मालमत्तेसमोर बँड वाजवण्याची‎ मोहीम सुरू करण्यात आली आहे.‎

या माध्यमातून थकबाकीदारांनी‎ मालमत्ता कर, पाणीपट्टी व जागा‎ भाडे भरावे असे आवाहन‎ पालिकेच्या वतीने विविध भागात‎ जाऊन बँड वाजवून करण्यात येत‎ आहे. मुख्याधिकारी नागेंद्र‎ मुतकेकर यांच्या मार्गदर्शनानुसार‎ ही मोहीम सुरू असून यात कर‎ वसुली अधीक्षक आदित्य मुरकुटे,‎ स्वच्छता निरीक्षक सागर झावरे,‎ राधेशाम निकम, उदय परदेशी,‎ अशोक कासारे, राजेंद्र गंगापूरकर,‎ नितीन काळण सहभागी होते.‎

बातम्या आणखी आहेत...