आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील कुंदलगाव शिवारात मनमाड- मालेगाव रोडवर मालट्रक व कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील पत्नीचा मृत्यू झाला तर पती, मुलगा व मुलगी हे गंभीर जखमी झाले. मनमाडकडून मालेगावकडे भरधाव जाणारी मालट्रक दि. २६ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कुंदलगाव जवळील वळणावर पुढे जाणाऱ्या मालट्रकला ओव्हरटेक करीत असताना समोरील मालेगाव येथून येवला येथे जात असलेल्या टाटा टिएगो कारवर लाइट मारल्याने चालकाने घाबरून कार राँग साईडला घेतल्याने निंबाच्या झाडावर आदळली.
या अपघातात कारचालक प्रमोद केदार (४६, रा. येवला), त्यांचा मुलगा व मुलगी यांच्या हातापायास मार लागून ते गंभीर जखमी झाले तर पत्नी सीमा प्रमोद केदार (३८) गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.