आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील अवैध व्यवसायामुळे कौटुंबिक शांततेला बाधा पोहाेचून कुटुंब संस्कृती व सदस्यांना होणारा मनस्ताप पाहता दिंडोरी तालुक्यातील अनेक ठिकाणी महिला रणरागिनींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिंडोरी, जानोरी, जालखेड येथे महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. तालुक्यातील सर्वच अवैध व्यवसाय बंदिसाठी महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता वरखेडा, कोंबडवाडी परिसरातील महिलांनी बेकायदा दारु विक्रीबाबत मोहीम उघडली आहे.
याविरोधात जनजागृतीसाठी सहायक पाेलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांना साकडे घातले आहे. महिलांच्या भावना लक्षात घेता त्वरित अवैध व्यावसायिकांची माहिती देण्याबाबत आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्याचे आश्वासन पाेलिसांनी दिले आहे. दरम्यान याविरोधात ग्रामपंचायतीने ठराव करून समूळ उच्चाटनासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
माहिती द्या त्वरित कारवाई करू
वणी पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात ३४ कारवाया केलेल्या आहेत. समुपदेशन केल्याने काही अवैध दारू विक्रेत्यांनी हा व्यवसाय सोडून मजुरीचा मार्ग अवलंबविला आहे. कोणी व्यक्ती अवैध दारू विक्री करत असेल तर माहिती द्यावी, तत्काळ कारवाई केली जाईल. - स्वप्नील राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक, वणी
पाेलिसांकडून कारवाईची अपेक्षा
वरखेडा ग्रामपंचायतीने वरखेडा व कोंबडवाडी परिसरातील दारू बंदीचा ठराव केला आहे. त्यामुळे अवैध धंद्यांविराेधात पोलिसांनी कडक कारवाई करावी. - जयश्री कडाळे, सरपंच, वरखेडा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.