आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला अनेक क्षेत्रात अग्रेसर असून प्रत्येक क्षेत्रात त्यांचे शोषण होत आहे. बलात्कार, छेडछाड, सोशल मीडिया व प्रेमसंबंधामधून होणारी फसवणूक अशा अनेक घटना या रोज होतात. महिलांनी अशा घटनांना बळी न पडता आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी कायद्याचा उपयोग करावा. गुन्हामुक्त समाज घडवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश अनुराधा पांडुळे यांनी केले. महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या क्रांतिसूर्य शहरस्तरीय संघातर्फे आय. एम. ए. हॉल येथे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना न्या. पांडुळे बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी उपायुक्त डॉ.श्रीया देवचके होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक मोटर निरीक्षक सुवर्णा देवरे, गायत्री चव्हाण, इनरव्हील क्लब सदस्य डॉ. शीतल देसले, यशस्वी लोकसाधान केंद्र, अध्यक्ष अनिता सोनवणे उपस्थित होत्या. याप्रसंगी सहायक मोटर निरीक्षक देवरे, इनरव्हील क्लब सदस्य डॉ. देसले, डॉ. देवचके यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. बचतगटाच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या रूपाली दशपुते, उपाध्यक्ष करुणा मराठे, सचिव प्रमिला खरोटे व सदस्य यांचे, महानगरपालिका समुदाय संघटक, लोकसंचलित साधन केंद्र सहयोगीनी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. बँकेमार्फत कर्ज मंजूर झालेल्या गटांना व खाद्यान्न योजना अंतर्गत कर्ज मंजूर गटांना धनादेश वाटप करण्यात आले. पीएम स्वनिधी अंतर्गत महिला पथविक्रेते यांना डिजिटल परिचय पत्र वाटप करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.