आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने महागाईचा भडका उडून सर्वसामान्यांवर मोठा आर्थिक बोजा पडल्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात बुधवारी (दि. ८) दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे येथील एकात्मता चौकात तीव्र निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली. महिला शिवसैनिकांनी भर बाजारपेठेत रिकामे सिलिंडर समोर ठेवत चुली पेटवल्या व त्यावर भाकरी भाजत महिला दिन या आंदोलनातून अभिनव पद्धतीने साजरा केला. सरकारच्या धोरणावर सडकून टिका करीत महिलांनी हे ‘अच्छे दिन'' दाखवल्याचा समाचार घेत ‘माेदी सरकार हाय हाय''च्या घोषणा दिल्या. महागाई कमी झालीच पाहिजे, गॅस दरवाढ कमी करा, उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
माजी आमदार राजाभाऊ देशमुख, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, जिल्हा संघटक संजय कटारिया, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, संघटक संतोष जगताप, शिवसेना शहरप्रमुख माधव शेलार, नांदगाव शहरप्रमुख श्रावण आढाव, युवासेना जिल्हा उपप्रमुख आशिष घुगे, युवा तालुकाप्रमुख सनी फसाटे, युवासेना शहरप्रमुख अंकुश गवळी, इरफान शेख, महिला आघाडीच्या रेणुका जयस्वाल, तालुकाप्रमुख लीलाबाई राऊत, मुक्ताबाई नलावडे, सुरेखा मोरे, कैलास गवळी, कैलास भाबड आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
अनावश्यक दरवाढ रद्द करा
गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने देशातील जनतेला उन्हाळा सुरू होण्याआधीच महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत. कोरोना संकटात होरपळून निघाल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था कुठेतरी स्थिर होण्याच्या मार्गावर असताना मूलभूत वस्तूंच्या किमतीमध्ये जबरदस्त भाववाढ झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. केंद्र सरकारने अनावश्यक दरवाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी येथील मंडल अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सिलिंडर दरवाढीमुळे चुलीचा आधार
गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे महिलांना आता चुलीवर स्वयंपाक करावा लागणार आहे. आज आम्ही भर रस्त्यात चूल मांडून भाकरी थापली. - मुक्ताबाई नलावडे, ज्येष्ठ महिला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.