आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय सेवा योजनेसेरख्या माध्यमातून श्रमसंस्कार शिबिरे घेतली जातात. यात महाविद्यालयातील तरुण स्वयंसेवकांचा ग्रामीण संस्कृतीशी संबंध येतो. ग्रामरचनेतील समस्या समजावून घेऊन त्यावर उपाय योजनेसाठी हा स्वयंसेवक प्रयत्न करत असतो. त्यामुळे अशा शिबिरांमधून स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकी जपण्याचे कामही होते, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले.
सिन्नर महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपसभापती देवराम मोगल, संचालक रमेश पिंगळे, पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, प्राचार्य डॉ. पी.व्ही. रसाळ, अमित बोरसे, सरपंच ज्ञानेश्वर ढोली, उपसरपंच कल्पना ढोली, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल वामने, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अंबादास वाजे, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र घुमरे, प्राचार्य के.एस. जाधव, दामोदर कुंदे, अरुण वारुंगसे, ग्रामपंचायत सदस्य नंदा पवार, उपप्राचार्य डॉ. डी.एम. जाधव, प्रा. आर.व्ही. पवार आदी उपस्थित होते. उपसभापती देवराम मोगल यांनी पुस्तकाविरहित अभ्यास करण्याची संधी अशा शिबिरांमधून स्वयंसेवकांना प्राप्त होते.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिबिरांमधून मिळणाऱ्या प्रत्यक्ष शिक्षणाचा लाभ घेऊन व्यक्तिमत्त्व विकास करून घेण्याचे आवाहन केले.
नारायण वाजे यांनी शिबिरे हे व्यक्तिमत्त्व विकासासाठी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त स्वविकास करून घ्यावा, असे सांगितले. प्राचार्य डॉ. रसाळ यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांचा मानसिक विकास चांगल्या तऱ्हेने होतो. ग्रामीण भागातील माणूस समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते, असे सांगितले. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.बी. कर्डक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. जी. भागवत यांनी आभार मानले. प्रा. ए. ए. पोटे, प्रा. ए. आर. पगार, प्रा. एस. झेड. ठाकरे, प्रा. एल. एस. कळसकर, प्रा. आर. टी. सोनवणे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.