आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीबाई फुले विद्यापीठ देणार आयाेजनासाठी निधी‎‎:164 काॅलेजांमध्ये नवीन‎ शिक्षण धाेरणावर कार्यशाळा‎‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‎सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत‎ विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्धीसाठी नाशिक, पुणे, अहमदनगर, दादरा हवेली येथील‎ १६४ महाविद्यालयांना निधी उपलब्ध करून दिला आहे.

यामुळे आता‎ प्रत्येक महाविद्यालयांमध्ये शिक्षण ‎सुधारणेसाठी कार्यशाळा अन् प्रसंगी ‎अत्याधुनिक बाबींची विद्यार्थ्यांसाठी ‎उपलब्धता होईल. असा निधी देणारे‎ सार्वजनिक क्षेत्रातील पुणे विद्यापीठ‎ हे एकमेव विद्यापीठ आहे.‎ कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार‎ म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०२२-२३‎ साठी ज्या महाविद्यालयांनी अर्ज‎ केले होते त्यापैकी १६४‎ महाविद्यालये या योजनेसाठी पात्र‎ ठरली असून त्यामध्ये राष्ट्रीय‎ स्तरावरील कार्यशाळा आयोजित‎ करण्यासाठी पुणे शहर येथील ४९,‎ पुणे ग्रामीण येथील १६, नाशिक‎ येथून १९, अहमदनगर येथून १५,‎ दादरा हवेली येथील १ अशा शंभर‎ महाविद्यालयांचा समावेश आहे.‎ यांच्यासाठी प्रत्येकी एक लाख‎ रुपयांचे अनुदान देण्यात येणार‎ आहे. या कार्यशाळेसाठी पुणे शहर‎ येथील २७, पुणे ग्रामीण येथील १७,‎ नाशिक येथील १२ व अहमदनगर‎ येथील ८ असे एकूण ६४‎ महाविद्यालयांचे अर्ज पात्र ठरले‎ आहेत. या महाविद्यालयांना प्रत्येकी‎ ५० हजार रुपये अनुदान दिले आहे.‎

माहितीपर उपक्रम‎ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे केवळ‎ विद्यापीठ व वर्तुळाभोवती मर्यादित‎ न राहता व्यापक स्वरूपात, ग्रामीण‎ भागातही त्याची तेवढीच‎ अंमलबजावणी होणे आवश्यक‎ आहे. महाविद्यालयांनी या संधीचा‎ लाभ घेत व्यापक स्वरूपात माहिती‎ सर्वांना उपलब्ध करून द्यावी .‎ - डॉ. संजीव सोनवणे,‎ प्र- कुलगुरू‎ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

बातम्या आणखी आहेत...