आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमेचे पूजन‎:सिन्नरला संत तुकाराम‎ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन‎

सिन्नर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ नागरिक संघ, महामित्र‎ परिवार यांच्या वतीने संत तुकाराम‎ महाराज जन्मोत्सवनिमित्त माजी‎ नगरसेवक पांडुरंग वारुंगसे यांच्या‎ हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.‎ गोरख सावंत, सुनील आरोटे,‎ शिवाजी शिंदे, झुंबर पालवे,‎ उत्तमराव घुगे, अशोक पाटील,‎ मनोहर नवसे, धीरज पटेल, उत्तम‎ कडलग, हरिभाऊ पवार, सोमनाथ‎ शेळके आदी उपस्थित होते.‎ मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते डी.‎ डी. गोर्डे यांनी संत तुकोबारायांच्या‎ प्रयत्नवादावर, विज्ञान निष्ठतेच्या‎ अभंगावर मनोगत व्यक्त केले. दत्ता‎ वायचळे यांनी जीवनकार्यावर‎ माहिती दिली.

सागर भालेराव यांनी‎ ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म'' या‎ अभंगावर विवेचन केले. माजी‎ प्राचार्य दत्तात्रेय डोंगरे यांनी‎ तुकोबारायांच्या व इतर वारकरी‎ संप्रदायाच्या कार्याबद्दल मनोगत‎ व्यक्त केले.‎ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष‎ अशोक घरटे यांनी प्रास्ताविक केले.‎ अनिल थोरात यांनी सूत्रसंचालन‎ केले. सेवानिवृत्त अभियंता बाबूराव‎ बोडके यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...