आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रतिजेजुरी मऱ्हळ खुर्द येथे सोमवार (दि. ६) पासून खंडोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ हाेत आहे. चार दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली. सरपंच शिवाजी घुगे, पोलिस पाटील संदीप कुटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जयराम कुटे, भगीरथ लांडगे, नामदेव कुटे, भाऊसाहेब बोडके, चंद्रकात कुटे, विठ्ठल लांडगे, लक्ष्मण ताडगे आदीं उपस्थित होते. समितीच्या बैठकीत नियोजनावर चर्चा झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि. ६ ) खंडोबा महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सनई, संबळ मंगलवाद्याच्या गजरात पालखी बागेत नेण्यात येईल. या दिवशी रात्री जय मल्हार मित्र मंडळ मुंबई यांच्या वतीने शोभेच्या दारूच्या आतषबाजीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री ९ वाजता मनोरंजनासाठी मंगला बनसोडे यांच्या लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता हजेरीचा कार्यक्रम होणार आहे.
दुपारी तीन वाजता कुस्त्यांची दंगल आयाेजित करण्यात आली आहे. यात्रेच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी खंडोबा महाराजांची पालखी बागेतून मंदिरात मिरवणुकीने आणण्यात येणार आहे. यानंतर यात्रेची सांगता होणार आहे. यात्राेत्सव यशस्वितेसाठी यात्रा समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.