आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका प्रशासनाचा निर्णय:येवला शहराला सोमवारपासून हाेणार चार दिवसांआड पाणीपुरवठा

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने पालिकेने सोमवारपासून चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी पुरवठा टप्पा क्रमाने २ च्या योजनेतील तलावाची साठवण क्षमता ५० दलघफू इतकी आहे. सद्या साठवण तलावात केवळ ५ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सोमवारपासून तीन दिवसांऐवजी शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

शहराला पिण्यासाठी दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. त्यामुळे आवर्तन मिळेपर्यंत पाणी पुरवावे लागणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. १० जानेवारीपर्यंत पालखेड डावा कालव्याचे आवर्तन येण्याची अपेक्षा असून तोपर्यंत पाणी जपून वापरावे. शहरात नळांना पाणी आल्यानंतर पाण्याची नासाडी होणार नाही याबाबत देखील नागरिकांनी जागरूकता दाखवावी, असे आवाहन मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी केले आहे.

साठवण तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याने तसेच साठवण तलावाच्या लगतच्या सुमारे २०० विहिरींतून सुरू असलेला पाणी उपसा हा प्रश्न कायम आहे. आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पालखेडच्या अवर्तनातून पूर्ण क्षमतेने साठवण तलाव भरणार असून आगामी काळात किमान ६० दिवस तरी शहराला पाणी पुरवण्याचे आव्हान पालिकेला पेलावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...