आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:योगेशकुमार वडगावकर नांदगावच्या विद्यालयात प्रथम; व्ही. जे. हायस्कूलचा निकाल 96.28 टक्के

नांदगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील व्ही. जे. हायस्कूलचा निकाल ९६.२८ टक्के लागला यात सिद्धिका योगेशकुमार वडगावकर ९७ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्याच प्रमाणे रोहन सुधाकर खैरनार ९५.२० टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक. खुशी प्रवीण निकम ९४.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. चैताली प्रकाश जैनने ९२.४० टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक. आकांक्षा आशिष रत्नपारखीने ९२.२० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला. यावर्षी २५९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील १९ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. विशेष श्रेणीत १३२ विद्यार्थांनी उत्तीर्ण झाले.

सर्व यशस्वी विद्यार्थाचे संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र कलाल, सचिव आश्विनीकुमार येवला शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड, उपमुख्याध्यापक मनोहर बडगुजर, पर्यवेक्षक मनोहर शिंदे, भैयासाहेब चव्हाण, भास्कर मधे, वर्गशिक्षिका दीपाली सांगळे, गुलाब पाटील, सुभाष लाड व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...