आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:सटाणा - मालेगाव रस्त्यावर दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

सटाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मालेगाव रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी चालक तरुण जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी (दि. १) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडला.

आराई (ता. बागलाण) येथील धनंजय परशुराम अहिरे (२०) सटाणा शहराकडून आराई येथे आपल्या घरी जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यापारी संकुलाच्या कठड्याला धडक दिली. त्यात धनंजयच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक व बाजार समितीच्या सुरक्षारक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी तरुणास रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेची माहिती सटाणा शहर व आराई गावात पसरताच पोलिस, नातेवाईक व ग्रामस्थांनी मध्यरात्री उशीरा सटाणा ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. आराई येथील स्मशानभूमीत धनंजयवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बागलाण पंचायत समितीचे माजी उपसभापती परशुराम अहिरे यांचा धनंजय एकुलता एक मुलगा होता. यामुळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातम्या आणखी आहेत...